भुसावळ (प्रतिनिधी) – भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी “योग्य दिशा – उज्ज्वल भविष्याची हमी” या विषयावर करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व करिअरच्या योग्य संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉ. जयंत लेकुरवाळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता संतोषी माता हॉल, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नुकतीच सभा घेण्यात आली. या सभेस कुटुंबनायक ललित पाटील व विभाग प्रमुख सुहास चौधरी यांनी पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन केले.
सौ. आरती चौधरी यांनी कार्यक्रमाची माहिती देताना विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच सुभाष भंगाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस परिक्षित ब-हाटे, चेतन पाटील, शरद फेगडे, संजय पाटील, अनिल वारके, महेश फालक, हरीष फालक, आर. जी. चौधरी, कावेरी चौधरी, मंगला पाटील, संध्या वराडे, चंद्रकांत चौधरी, धीरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दहावी व बारावीतील सर्व विद्यार्थी तसेच पालकांनी या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे करण्यात आले आहे.


