भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

संपूर्ण गावात सकाळपासूनच जयंतीचा उत्सवी माहोल पाहायला मिळाला. सकाळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाला सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश सरदार, एन. टी. इंगळे, दुर्गेश कोलते, ग्रामपंचायत सदस्य उल्हास बोरोले, यासीन पठाण, सन्नी चाहेल, दिलीप बऱ्हाटे तसेच नॅशनल व्हॉइस मीडिया चे जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे आणि जिल्हा सचिव रमेश खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनीष सुरवाडे, राहुल वाघ, तरुण गवई, निखिल मेश्राम, अजय वाघ, अरुण भालेराव, गौरव नरवाडे, निखिल नरवाडे, सुमित चतुर, चिकू मेश्राम, सूरज पवार, साहिल साळवे, शुभम खंडारे, कुणाल इंगळे, अनिकेत मोरे आदींनी परिश्रम घेतले. तसेच विश्वरत्न महिला मंडळाच्या सदस्यांनीही विशेष सहकार्य केले.
भारतीय बौद्ध महासभेच्या नव्याने नियुक्त अध्यक्ष उषा सुरवाडे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संध्याकाळी संपूर्ण गावातून वाजंत्रीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. “जय भीम”च्या घोषणांनी निंभोरा बुद्रुक परिसर दणाणून गेला. या उत्सवात सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



