लंडन येथील निवासस्थानाचा भव्य प्रतिकृती साकारली : ४० मिरवणुका, स्टेशन रोड दुपारनंतर चारचाकींसह अवजड वाहनांसाठी बंद :संपूर्ण भुसावळ शहर रोषणाई, निळ्या ध्वजांनी सजले

भुसावळ (प्रतिनिधी)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहर निळेमय झाले आहे. सोमवारी (दि.१३) रात्री ९ वाजेपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर अनुयायांनी गर्दी करुन जल्लोष केला. दरम्यान, मंगळवारी दुपारपासून शहरातील विविध भागांतून तब्बल ४० मिरवणुका निघतील. यामुळे शहरातील स्टेशन रोडवरील चारचाकी अवजड वाहतूक दुपारनंतर बंद केली नाईल. सोबतच जामनेर रोडवर एकेरी वाहतूक होईल. यंदा जयंती समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानाची प्रतिकृती साकारली आहे.

भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळून ४० सार्वजनिक मंडळांच्या वतीने भव्य मिरवणुका काढण्यात येतील. या पार्श्वभूमीवर जामनेर रोड, यावल रोड, जळगाव मार्गावर रोषणाई करून निळे ध्वज लावले आहेत. स्टेशन रोडवर बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून पकेस्थानकापर्यंत तसेच सतारे ब्रीज ते महाराणा प्रताप चौकासह विविध गांमध्ये भीमसैनिकांनी आकर्षक रोषणाई केली आहे. जयंती उत्सवासाठी मसैनिकांनी गेल्या आठवड्यापासून व्यत तयारी केली. जुन्या पालिका रतीसमोरील डॉ. बाबासाहेब बेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परात सशोभिकरण केले तेथे

भीम जयंतीनिमित्त जुन्या पालिकेजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रोषणाई केली आहे.

पुस्तक वितरण, रक्तदान शिबिर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्ताने शहरात मंगळवारी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. विविध सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबिर, पुस्तक वितरण आदी कार्यक्रम होतील. विविध सामजिक संस्थांच्या माध्यमातून मिरवणूक मार्गावर थंड व शुद्ध पाणी वितरण केले जाणार आहे. वंचित आघाडीतर्फे बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ तर काँग्रेसच्या अॅड. प्रवीण सुरवाडे यांच्यातर्फे रेल्वे वास्तू संग्रहालयाजवळ ही सुविधा असेल.

एलईडीवर दाखवणार दुर्मीळ फोटो

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समितीने जळगाव येथून ट्रस्ट एलईडी शो मागवला आहे. एलईडी स्क्रीनवर डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून आठवणींना उजाळा दिला जाईल. डॉ. बाबासाहेबांचे संग्रहित दुर्मिळ व ओरिजनल फोटो एलईडी स्क्रिनवर दाखवले जाणार आहेत,

यंदा ६० फूट उंच देखावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन १९२१ ते १९२२ या दरम्यान लंडन येथील निवासस्थानी राहिले होते. या निवासस्थानाची भव्य ६० फूट उंच आरास यंदा जयंती उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. ही आरास नेत्रदीपक ठरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोनू नेतकर व सर्व भिमसैनिक सहकार्य करत आहेत.

जयंती उत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील बसस्थानकाचे तीन दिवसांसाठी वरणगाव रोडवरील एसटी डेपोत स्थलांतर केले आहे. बुधवारी सकाळपासून

रात्री १२ पर्यंत मिरवणूक

जयंतीची मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहील. प्रत्येक मिरवणुकीला पोलिस, होमगार्ड यांचा बंदोबस्त असेल. सोबतच मिरवणूक मार्गावरील मदिना मशीद आणि इतर प्रार्थनास्थळांजवळ विशेष सुरक्षा व्यवस्था असेल. सर्व मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणूक संपवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्याचे डीवायएसपी केदार बारबोले यांनी सांगितले.

उद्या बसस्थानक पूर्ववत

बसस्थानक पूर्वीच्या जागेत सुरु होईल. सध्या यावल, जळगाव, रावेर, छत्रपती संभाजीनगर, मुक्ताईनगरसह विविध भागात जाणाऱ्या बसेस डेपोतूनच सोडल्या जात आहेत.