सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती रॅली

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील गजबजलेल्या आठवडे बाजारात खरेदीसाटी येणारया नागरिकांचे मोबाइल आणि पाकीट लंपास करणा-या विरुद्ध आता बाजारपेठ पोलिसांनी कंबर कसली आहे. मात्र, केवळ गुन्हे दाखल करण्यापुरते मर्यादित राहता पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने रैली काढून जनजागृतीवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी आठवडे बाजारात पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी स्वतः जनजागृती मोहीम राबवली बाजारात खरेदीरसठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधून खबरदारीच्या सूचना दिल्या.

डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी ही मोहीम राबवली. आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करतात. हे रोखण्यासाठी पोलिसांनी एनसीसी विद्याथ्यांच्या मदतीने हातात फलक घेऊन रॅली काढली. ‘मोबाइल वरच्या खिशात ठेवू नका, पाकीट मागच्या खिशात ठेवणे टाळा’ अशा सूचना या फलकांद्वारे देण्यात आल्या.

पोलिस आणि विद्यार्थ्यांनी मिळून राबवलेल्या या जनजागृती मोहिमेचे बाजारात आलेल्या नागरिकांनी कौतुक केले, विशेषतः एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी घेतला उत्साहाने सहभाग घेत नागरिकांना चौरीच्या पद्धतीपासून सावध केले, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुद्धा जनजागृती करताना दिसले. दुसरीकडे चोरट्यांचा बदोबस्त करण्यासाठी बाजारात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवली आहे.

खबरदारी हीच चोरी रोखण्यासाठी पहिली पायरी

नागरिकांना दिल्या खबरदारीच्या टिप्स

पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधला. चोरटे गर्दीत कशा प्रकारे वावरतात आणि लोकांचे लक्ष विचलित करून मोबाइल करी चोरतात, याची माहिती त्यांनी दिली, मोबाइल वरच्या खिशात ठेवला की ती सहज काढता येतो, तसेच मागच्या खिशातून पाकीट वर आलेले असते, जे चोरट्यांसाठी सोपे लक्ष्य ठरते, असे वाघ यांनी नागरिकांना रामजावून सांगितले,

नागरिकांनी स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे हीच चोरी रोखण्याची पहिली पायरी आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा, मोबाइल चोरीला गेल्यास ऑनलाईन सीईआयआर पोर्टलवर माहिती भरून द्यावी, तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात जाण्याची गरज पडणार नाही. – राहुल वाघ, पोलिस निरीक्षक
शहरातील अष्टभुजा देवी मंदिर
चौक आणि मुख्य आठवडे बाजारात ही मोहीम राबवण्यात आली. सकाळी १० वाजेपासून
पोलिस निरीक्षक वाघ व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी आठवडे बाजार व जामनेर रोडवर
गर्दीच्या ठिकाणी थांबून जानजागृती केली. नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.