भुसावळ (प्रतिनिधी) –

रेल्वे उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी उधना ते मालदा टाउन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात येणार आहेत.
यामध्ये उधना ते मालदा टाउन साप्ताहिक विशेष गाडी (३२ सेवा)
ट्रेन क्रमांक 09033 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०९.०४.२०२६ ते २३.०७.२०२६ या कालावधीत उधना येथून दर गुरुवारी २३.०० वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)
ट्रेन क्रमांक 09034 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १२.०४.२०२६ ते २६.०७.२०२६ या कालावधीत मालदा टाउन येथून दर रविवारी ०९.३० वाजता सुटेल आणि उधना येथे तिसऱ्या दिवशी ०१.२० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)
थांबे -: नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, किऊल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बडहरवा आणि न्यू फरक्का.
संरचना : २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅन.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते हावडा विशेष गाडी (२ सेवा)
ट्रेन क्रमांक 01145 विशेष गाडी दिनांक १४.०४.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २०.१५ वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पोहोचेल. (१ सेवा)
ट्रेन क्रमांक 01146 विशेष गाडी दिनांक १६.०४.२०२६ रोजी हावडा येथून १४.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. (१ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खरगपूर आणि सांतरागाछी.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय, ९ वातानुकूलित तृतीय, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीयसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
तिकिटांच्या आरक्षणासाठी प्रवासी ‘RailOne’ ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील वेळापत्रकाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.


