भुसावळ (प्रतिनिधी) – प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ यांच्या वतीने भुसावळ शहर व तालुक्यातील काव्य रसिकांसाठी ‘चैत्रपालवी’ या बहूभाषिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे कविसंमेलन रविवार, दिनांक 29 मार्च 2026 रोजी ब्राह्मण संघ भुसावळ येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात विविध कवी आपल्या काव्यरचना सादर करणार असून, साहित्यप्रेमींना काव्यरसाचा आस्वाद घेण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. शहर व परिसरातील सर्व काव्यरसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


