भुसावळ (प्रतिनिधी ) – गणगौर उत्सव निमित्ताने येथील राजस्थानी विप्र महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिव-पार्वतीच्या प्रतिमेची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.


यावेळी गणगौर मिरवणूक जुने बालाजी मंदिर येथून काढण्यात आली. ही मिरवणूक सराफ बाजार, लक्ष्मी चौक, अप्सरा ड्रेस रोड, नृसिंह मंदिर मार्गे श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर येथे समारोप करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा यांच्यासह बबिता शर्मा, ज्योती शर्मा, शशिकला शर्मा, सोनल शर्मा, पूजा चौबे, कांता शर्मा, धर्मेंद्र शर्मा, डॉ. कमलाकांत शास्त्री, सत्यनारायण शर्मा, जे. बी. कोटेचा, रामनारायण शर्मा, प्रवीण जोशी, नरेंद्र अग्रवाल, जग्गू अग्रवाल, शैलेंद्र बमलेले, मनीष शर्मा, संजय चांडक, दीपचंद आगीवाल, गोकुळ अग्रवाल, आदित्य शर्मा, सतीश शर्मा, राजेश शर्मा, कैलास वाणी, सुनील ठाकूर, विजय सावदेकर, विनोद सोनार, डॉ. प्रशांत बजाज, शाम अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, नितीन शर्मा, सुनील भादुपोता, राधेश्याम तिवारी यांच्यासह राजस्थानी व विप्र संघटनेचे महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



