चार वेद व पवित्र धर्मग्रंथांचा पालखी सोहळा उत्साहात :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील ब्राह्मण संघ आयोजित सालाबादप्रमाणे यंदाही वर्ष प्रतिपदेला हिंदू नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पवित्र धर्मग्रंथ चार वेद तसेच रामायण, महाभारत, श्रीमद भगवत गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत या ग्रंथांचे पूजन व पालखी मिरवणूक सोहळा दि.19 मार्च 2026 रोजी सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत संपन्न झाला.
पालखी सोहळ्याला सकल हिंदू समाज प्रतिनिधी राजेश कोष्टी, उज्वल सराफ, अशोक गुरव भादलीकर, शाम माहूरकर, यश इंगळे, अभिमन्यू टेमकर यांच्यासह ब्राह्मण संघांचे अध्यक्ष गणेश वढवेकर यांनी चार वेद व पवित्र धर्मग्रंथाचे पूजन करून सुरुवात केली.

हिंदू धर्मातील सर्व ज्ञाती बांधवांच्या उपस्थितीत ब्राह्मण संघ ते अष्टभुजा देवी मंदिर व परत ब्राह्मण संघ या मार्गाने पालखी मिरवणूक पारंपरिक गुरव वाजंत्रीच्या मंगलमय वाद्य व प्रभू श्रीरामांच्या जयघोष करीत महिला व पुरुष मंडळी पालखी सोहळ्यात सहभागी झाले.

यावेळी श्रीमती डॉ.सुषमा खानापूरकर, कल्पना दामले, वैशाली एकलारकर, मृदुला गोडबोले, लक्ष्मी वढवेकर, प्रतिभा बोचरे, साधना रिसबूड या माहिलांसह माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, संघांचे माजी सचिव प्र.ह. दलाल, संघांचे विद्यमान सचिव महेंद्र गोडबोले, कोषाधक्ष अमोद टेंभूर्णीकर, पंकज जोशी, जयंत जोशी, शंतनू गचके, डॉ.प्रा.रमेश जोशी, संजय बोचरे, सुनील पाठक, प्रणव वढवेकर, संघांचे व्यवस्थापक अशोक पाटील व विविध समाजाचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शरद अंबईकर यांनी उपस्थितांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था केली. सर्वांनी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देऊन निरोप घेत पालखी सोहळा संपन्न झाला.