भुसावळला शनिवारी कविता दिनानिमित्त ‘साहित्य मंथन’



भुसावळ(प्रतिनिधी ) -, ता. १९ : येथील खान्देश साहित्य संघाच्या शाखेतर्फे
जागतिक कविता दिनानिमित्त येत्या शनिवारी (ता. २१) ‘साहित्य मंथन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ सदाशिव सुर्यवंशी अध्यक्षस्थानी असतील.
नाहाटा महाविद्यालयात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत हा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. सुषमा खानापूरकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक, उद्योजिका मंगला पाटील,खानदेश साहित्य संघ जिल्हाध्यक्ष शरद धनगर,निवृत्त शिक्षण सचिव व कवी शशिकांत हिंगोणेकर, प्रा. संध्या महाजन, उमेश काटे, ज्येष्ठ साहित्यिक काशिनाथ भारंबे, बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील तसेच जळगाव जिल्ह्यातून अनेक मान्यवर कवी, कवयित्री,गझलकार उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष पत्रकार श्रीकांत जोशी असणार आहेत. उद्घाटन सत्र, कथाकथन सत्र, गजलगंध, काव्यरंग अशी भरगच्च साहित्यिक मेजवानी रसिकांसाठी खुली असणार आहे.‌ तरी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अशी माहिती खान्देश साहित्य संघ भुसावळ शाखेच्या अध्यक्षा जयश्री काळवीट व सचिव संध्या भोळे यांनी केले आहे.