भुसावळ (प्रतिनिधी ) : ८ मार्च, महिला दिनानिमित्त महिला क्रीडा मंडळ, भुसावळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “स्मार्टफोनची साथ की सावट” या विषयावरील निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राम मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती चौधरी होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. स्वाती फालक उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. स्वाती फालक यांनी महिला क्रीडा मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. मोबाईल, कॉम्प्युटर स्क्रीन आणि ए.आय.चा वाढता वापर आरोग्यावर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित व सजगतेने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आरती चौधरी यांनी सांगितले की, आजच्या काळात बाळ बसायला लागल्यापासून ते ८० वर्षांच्या आजीपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. समाजात या विषयाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने “स्मार्टफोनची साथ की सावट” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अतिशय उत्कृष्ट रितीने दिपाली सराफ यांनी केले, तर आभार सुंदर शब्दात जयश्री ओक यांनी मानले . प्रोजेक्ट चेअरमन प्रभाताई पाटील यांनीही स्पर्धेचे महत्त्व आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.
परिक्षण के. नारखेडे हायस्कूलचे शैलेन्द्र महाजन यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेक्रेटरी लता होसकोटे तसेच किरण चौधरी, विजया निकम, भारती चौहान यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, भेटवस्तू, प्रमाणपत्र व पेन देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनाही भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे :
प्रथम – सीमा राजेंद्र अकोले,
द्वितीय सरिता मनोज पनसारी ,
तृतीय सुशीला किशोर पाटील,
उत्तेजनार्थ… हर्षा पराग पाटील, पूनम हरीष लेले,
रणजिता हेमंत पाटील,
जास्वंदी नीलेश भंडारी
खुशी राजेंद्र चौहान ,
जागृती चौधरी, वर्षा लोखंडे .
एकुण ४५ भुसावळ जळगाव, सावदा, फैजपूर, वापी येथून स्पर्धकांनी भाग घेतला होता.
क्रिडा मंडळाच्या साधना सराफ, वैशाली अनंत पाटील, मनिषा पाटील, जयश्री दवे, चारू महाजन, सुनिता पाचपांडे, प्रिता पिंगळे हजर होते.



