भालोद महाविद्यालयात जागतिक महिला दिन निमित्त विशेष कार्यक्रम :

भालोद – “ महिलांनी जिद्द आणि आत्मविश्वास जवळ ठेवावा तर कोणतेही कठीण काम हे यशात रूपांतरित होते, विशेष करून महाविद्यालयातील तरुणींनी आत्मविश्वासाच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवावे, ज्या महिला भगिनींनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेले आहे त्या महिला भगिनींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, तसेच सुसंस्कारित शिक्षण प्राप्त करून देशाची भावी नागरिक म्हणून समाजाच्या उपयोगी पडावे. महिला अनेक भूमिकांमध्ये वावरतात आणि समन्वय साधून काम करीत असतात.महिलांनी सर्व क्षेत्रात सहभागी होवून आपले कर्तुत्व सिद्ध करावे आणि नकार देण्याचे धाडस निर्माण करावे.आपल्या कमजोरीला आपल्या क्षमतांमध्ये रुपांतरीत करा कमजोरीला अडथळा न समजता त्याला एक आव्हान समजून जिद्दीने कृतीशील राहा ” असे प्रतिपादन सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन मा. सौ हेमलता ताई इंगळे यांनी केले.

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन निमित्त विशेष कार्यक्रमांमध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ सुनील नेवे यांनी केली. याप्रसंगी संस्थेच्या चेअरमन सौ हेमलता ताई इंगळे यांना राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षांमध्ये महिला चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली त्याबद्दल त्यांना हे सन्मानपत्र देण्यात आले. सन्मान पत्राचे वाचन विद्यार्थिनी हेमांगी इंगळे हिने केले.

याप्रसंगी संस्था चेअरमन हेमलता ताई इंगळे, प्रा हेमलता कोल्हे, प्रा जानवी परतणे, श्रीमती मोहिनी चौधरी, विद्यार्थिनी कोमल तायडे, हेमांगी इंगळे, हेमांगी महाजन, करिष्मा महाजन, राजश्री कोळी, प्रांजल सोनवणे, प्रियंका वसाने, हर्षदा हटकर, साक्षी भिरूड, मेघना भारंबे, धनश्री कोळी, टीना मेघे, भाग्यश्री सनान्से, गायत्री कोळी, पूजा मोरे ,चैताली पाटील, नंदिनी बडगुजर, निवेदिका कोळंबे, पायल महाजन, नम्रता चौधरी, कामिनी भालेराव,गायत्री दिघे,साक्षी चौधरी,राजश्री बर्हाटे या विद्यार्थिनींना राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. किशोर कोल्हे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींनी महाविद्यालयात नियमित यावे, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, तसेच महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी जिद्दीने आत्मविश्वासाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाऊल टाकावे असे आवाहन त्यांनी केले. कु.कामिनी भालेराव या विद्यार्थिनीने या प्रसंगी आपले कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कोमल तायडे तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी हेमांगी महाजन हिने केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा डॉ. जतिनकुमार मेढे, प्रा. डॉ. दिनेश पाटील ,प्रा. अजय गायकवाड, प्रा. डॉ. दिनेश महाजन,प्रा काशिनाथ पाटील, प्रा. डॉ.किरण चौधरी,प्रा. डॉ.वसंतराव पवार, मुबारक तडवी,पंकज नेहेते,तुळशीराम पाटील,किशोर चौधरी,रूपम बेंडाळे, कल्याण चौधरी,बाळकृष्ण चौधरी,श्री आतिकेश माळी, ताराचंद तेली, मुकुंदा महाजन,चंद्रकांत लोखंडे,निलेश सपकाळे, यांनी सहकार्य केले.