भुसावळ (प्रतिनिधी) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए, सीएस व सीएमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीए अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयातील डी-५३ या वर्गात संपन्न झाले. उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे तसेच सीए अर्पित काबरा (सीसीएम आय, सीए आय, नवी दिल्ली) यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार डॉ. मोहन फालक होते. यावेळी सीए हितेश आगीवाल (चेअरमन, डब्ल्यूआयआरसी जळगाव), सीए मुकेश अग्रवाल (भुसावळ), महेश फालक (चेअरमन, ताप्ती एज्युकेशन सोसायटी), विष्णू चौधरी (सचिव), संजय नाहाटा (कोषाध्यक्ष), प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. जी. आर. वाणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती पाटील व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

उद्घाटक ना. संजय सावकारे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी सीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळावे आणि The Institute of Chartered Accountants of India (ICAI) संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या वाचनालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उत्पन्नाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक, संपत्ती व कर नियोजन यासाठी समाजात सीएंचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सीए अर्पित काबरा यांनी भारतात उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे सीएंची गरज सातत्याने वाढत असल्याचे नमूद केले. ICAI भविष्यात अधिक संख्येने सीए उपलब्ध करून देणार असून वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी सांगितले.
सीए हितेश आगीवाल यांनी जळगाव जिल्हा व भुसावळ शहरात सीएंची संख्या वाढत असल्याचे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी अनुकूल वातावरण नाही, त्यांच्यासाठी ही अभ्यासिका उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीए मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वाढते महत्त्व ओळखून आवश्यक परिश्रम घ्यावेत, असे सांगितले. माजी विद्यार्थी संघटना व ICAI यांच्या संयुक्त विद्यमाने ही अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ. मोहन फालक यांनी माजी विद्यार्थ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत ताप्ती एज्युकेशन सोसायटीतर्फे आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच ICAI संस्थेचे आभार मानले.
ही अभ्यासिका ICAI, नवी दिल्ली जळगाव शाखेच्या सौजन्याने उपलब्ध झाली असून नाहाटा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व भुसावळचे सुप्रसिद्ध सीए मुकेश अग्रवाल यांचे यासाठी विशेष योगदान आहे. येत्या १९ तारखेपासून ही अभ्यासिका सीए, सीएस व सीएमए विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी. आर. वाणी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दीपक पाटील यांनी केले. या उपक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. आशिष चौधरी, कोषाध्यक्ष प्रा. हर्षल पाटील .गौरी पाटील,प्रा.स्मिता बेंडाळे प्रा.स्वाती शेळके,प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.कौस्तुभ पाटील,प्रा.भूपेंद्र बाणाईत मुकेश फिरके, श्भगवान तायडे, सचिन पाटील तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन – भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन करताना उद्घाटक ना संजयजी सावकारे , सीए अर्पित काबरा,सोबत ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ मोहन फालक,सीए मुकेश अग्रवाल इ.



