भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये “होली के रंग महिलाओ के संग” हा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून बियाणी एज्युकेशन ग्रुप यांच्या सेक्रेटरी डॉ. संगीता बियाणी उपस्थित होत्या. तसेच इलेक्ट्रिक लोको शेडचे मुख्य अभियंता चाणक्य जैन व त्यांच्या पत्नी प्रियांका जैन यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.

यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. संगीता बियाणी यांनी रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रियांका जैन यांनी शेडमधील महिलांसाठी प्रथमच विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनीही उपस्थित महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी विविध कला गुण सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. गुणवंत रेल्वे कर्मचारी महिलांचा चाणक्य जैन व प्रियांका जैन यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच महिलांनी एकत्रितपणे होळी साजरी करत रंगोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी हास्ययोगाचाही कार्यक्रम सादर करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुन्सफ अली यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्योती समुद्रे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओएस राजीव कुमार सिंग, ज्योती समुद्रे तसेच शेडमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन – रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको शेड मध्ये होली के रंग महिलाओ के संग कार्यक्रमात रंग लावून जल्लोष करतांना प्रियंका जैन व महिला दिसत आहे.


