यंदा जळगावकरांची नववर्षाची सुरुवात मैत्र महोत्सवाने होणार :

जळगाव (प्रतिनिधी ) : यंदा 1जानेवारीपासून ते 8 जानेवारी पर्यंत “परिवर्तन मैत्र महोत्सव” भाऊंच्या उद्यानात एमफी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा होणार आहे. स्वर्गीय भवरलाल भाऊ जैन, स्वर्गीय ना. धो. महानोर दादा यांच्या सोबत असलेला परिवर्तनचा प्रेम संबंध याची कृतज्ञता म्हणून हा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला अशा विविध कलांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा महोत्सव म्हणजे मैत्र महोत्सव आहे.

दिनांक १ जानेवारीपासून रोज सायं. ६.३० वा. विविध कलांचे सादरीकरण होणार आहे.
यामध्ये स्थानिक कलावंत सोबतच पुणे, कोकण, भुसावळ, शिरपूर अशा बाहेरील कलावंतांचा नाट्य अविष्कार देखील या महोत्सवात सादर केला जाणार आहे. महोत्सवाचे प्रमुख डॉ. रेखा महाजन, आर्किटेक्ट शिरीष बर्वे , इंजि. प्रकाश पाटील, नंदूभाई अडवाणी ,स्वरूप लुंकड ,विनोद पाटील, पारस राका , मानसी गगडाणी हे आहेत.
परिवर्तनचे प्रमुख अनिल कांकरिया, अनिश शहा, नंदलाल गादिया, अमरभाई कुकरेजा, छबिराज राणे, नारायण बाविस्कर यांचे मार्गदर्शन या महोत्सवाला लाभले आहे .
जैन उद्योग समूह, गांधी रिसर्च फाउंडेशन यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे.
परिवर्तनच्या मंजुषा भिडे , पुरुषोत्तम चौधरी, राजू बाविस्कर, हर्षल पाटील, होरीलसिंह राजपूत, विशाल कुलकर्णी , प्रा. किशोर पवार, प्रा. मनोज पाटील , वसंत गायकवाड, नेहा पवार, राहुल निंबाळकर, अक्षय नेहे , सुनील बारी , मंगेश कुलकर्णी, अंजली पाटील ,मोना तडवी ,जयश्री पाटील, नितीन सोनवणे, लीना लेले, मानसी जोशी , सुनीला भोलाणे, भगवान भोई , प्रतीक्षा कल्पराज, हर्षला कोल्हटकर , योगेश चौधरी , गणेश सोनार , नीलिमा जैन , बिना मलारा, ज्ञानेश्वर तळेले, विकास वाघ, भूषण गुरव, वरुण नेवे , दर्शन गुजराथी ,प्रतिभा कोळी , अमित माळी , श्वेतांबरी गरुड , विनोद अजनाडकर,
भाऊसाहेब पाटील, मिलिंद काळे ,
रोहित बोरसे, पवन भाई आदी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत.