धरणगाव नगरपालिका निवडणूक : महाविकास आघाडीच्या लीला चौधरी नगराध्यक्षपदी विजयी

धरणगाव (प्रतिनिधी ) – धरणगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती लीला बाई चौधरी यांनी नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या यशानंतर जळगाव येथे आगमन झाल्यावर त्यांचा विविध पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.

या वेळी संपर्क प्रमुख गुलाबभाऊ वाघ (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, धरणगाव येथील नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांच्या उपस्थितीत भुसावळ येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभाला शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, प्रा. उत्तमराव सुरवाडे, कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना श्रीमती लीला चौधरी यांनी मतदारांचे आभार मानत, धरणगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या विजयामुळे महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.