जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर, खडके येथे स्कॉफ पथकाची बाह्य मूल्यांकनासाठी भेट

भुसावळ (प्रतिनिधी) – खडके येथील जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर येथे दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी स्कॉफ (SCERT) पथकाने बाह्य मूल्यांकनासाठी भेट दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात पथकाचे उत्साहात स्वागत केले.

विद्यार्थ्यांनी परिपाठाद्वारे कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केली. त्यानंतर पथकप्रमुख, पथक सदस्य व शिक्षकवर्ग यांची संयुक्त सभा घेण्यात आली. या सभेत शालेय क्षेत्रे, मानके व स्तर याविषयी सविस्तर चर्चा करून पथकप्रमुखांनी आवश्यक मार्गदर्शन केले.

स्कॉफ पथकाने वर्गांना भेट देऊन अध्यापनाचे निरीक्षण केले तसेच शिक्षकांशी सखोल चर्चा केली. वर्गातील विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात मुलाखती घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्नांना उत्तरे देत चांगला प्रतिसाद दिला.

याशिवाय शालेय परिसराची पाहणी करण्यात आली. परिसरातील झाडे, बगीचा, परसबाग, स्वच्छता, शाळेचे मैदान, शौचालये, किचन शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी बाबींचे सविस्तर निरीक्षण करून त्यानंतर मूल्यांकन करण्यात आले.

बाह्य मूल्यांकनातील विविध मानकांअंतर्गत योग्य पुरावे व अभिलेखांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये काही गुणांची वाढ होऊन एकूण गुणांमध्ये सुधारणा झाली असून शाळेच्या श्रेणीतही सकारात्मक बदल झाला आहे.

या मूल्यांकन प्रक्रियेत स्कॉफ पथकप्रमुख म्हणून साकेगाव येथील केंद्रप्रमुख श्री. सुनील मोरे, तसेच पथक सदस्य श्री. विजय देवरे, श्री. अजय चालसे व श्री. राहुल पाटील यांनी कामकाज पाहिले.

जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. संजय रविंद्र साखरे तसेच शिक्षक श्री. ज्ञानदेव पाटील, श्री. निलेश महाजन व सौ. निलिमा फेगडे यांनी स्कॉफ पथकाचे स्वागत केले व शाळा मूल्यांकनासाठी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल संपूर्ण पथकाचे आभार व्यक्त केले.