महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर आणि आदिलाबाद दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष सेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिलाबाद येथून दादरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांचे परीचालन करणार आहे.

तपशील पुढीलप्रमाणे:
आदिलाबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आदिलाबाद अनारक्षित विशेष – २ सेवा

गाडी क्रमांक 07129 विशेष आदिलाबाद येथून शुक्रवार दिनांक ०५.१२.२०२५ रोजी ०७.०० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07130 विशेष दादर येथून रविवार दिनांक ०७.१२.२०२५ रोजी ०१.०५ वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे त्याच दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.

थांबे: किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, हुजूर साहेब नांदेड, पुर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, रोटेगाव, नागरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण.

संरचना: १२ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन

आरक्षण: सामान्य भाड्यासह अनारक्षित डब्यांतील आरक्षण UTS प्रणालीद्वारे करता येईल.

प्रवाशांनी याची नोंद घेऊन या सेवांचा लाभ घ्यावा, अशी विनंती करण्यात येते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या/जाणाऱ्या अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने पुरेसे उपाय केले आहेत.