भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ नगर पालिका निवडणुकीत आज मोठ्या उत्साहात मतदान होत असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांनी कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला. सकाळीच मतदान केंद्रावर उपस्थित होत त्यांनी लोकशाहीच्या सणात सहभागी होत नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकतेचा संदेश दिला.

मतदानानंतर बोलताना सौ. भंगाळे म्हणाल्या की, “भुसावळच्या विकासासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही मजबूत करण्यास हातभार लावावा,” असे आवाहन त्यांनी केले.
मतदान केंद्रावर त्यांच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण दिसून आले. शांततेत आणि सुव्यवस्थेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
भुसावळातील मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून नागरिकांत चांगला उत्साह पाहायला मिळत आहे.


