पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनीही बजावला मतदानाचा हक्क : मतदान करा लोकशाहीला बळकट करा – आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगर परिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लोकशाहीचा मूलभूत हक्क असलेल्या मतदानाचा उपयोग करून शहरातील अनेक मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली.

पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी लोकांना लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.
“मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्कच नव्हे तर कर्तव्य आहे. मी माझा हक्क बजावला आहे, आपणही आपल्या हक्काचा जरूर उपयोग करा,” असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

शहरातील विविध मतदान केंद्रांवर योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून मतदान शांततेत पार पडत आहे. नगर परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.