भुसावळ प्रतिनिधी :
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने भुसावळ प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. आज दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी निवडणूक निरीक्षक बाबासाहेब पारधी (अप्पर कलेक्टर, NMMRDA, नाशिक) यांनी भुसावळ शहरातील विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणी दरम्यान श्री. पारधी यांनी पोलिस कर्मचारी तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देत म्हटले की, ईव्हीएम आणि पोलिंग पार्टी सोडून कुठेही जाऊ नये. तसेच सर्व सेक्टर ऑफिसरांनीही या सूचनांची काटेकोर नोंद घेऊन पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार संतोष विनंते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. भुसावळ शहरात निवडणुका सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले.


