अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडून अधिक्षक अभियंत्याचा मृत्यू :

जळगाव( प्रतिनिधी ) – तापी पाटबंधारे महामंडळ विभागात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अभियंत्यांचा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने यांचा मृत्यू झाल्याची घटना घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधीक्षक अभियंता अरुण बाबूराव ढवळे (वय ४०, रा. संभाजी चौक, महाबळ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

शहरातील संभाजी चौकातील मातोश्री हाईट्स या अपार्टमेंटमध्ये अरुण ढवळे हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. शहरातील तापी पाटबंधारे विभागात ते अधीक्षक अभियंता म्हणून नोकरीस होते. गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ते अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडून गंभीर जखमी झाले. ही घटना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी ढवळे यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचे निधन झाले.

अरुण ढवळे हे तापी पाटबंधारे विभागात नोकरीस असल्याने त्यांची पदोन्नती झाल्याने ते तीन महिन्यांपुर्वी जळगावात पदोन्नती होवून आले होते. मातोश्री हाई-ट्स या अपार्टमेंटमध्ये ते भाडेतत्ववार कुटुंबियांसह राहत होते. परंतू दुर्देवी काळाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पदोन्नतीमुळे ते जळगावात आले होते आणि मातोश्री हाईट्स अपार्टमेंटमध्ये भाडेतत्वावर कुटुंबासह राहत होते. दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.