आधुनिक भारताचे जनक महात्मा जोतिबा फुले आहेत : जयसिंग वाघ

रावेर (प्रतिनिधी ) – भारतात इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून सामाजिक अधोगतीला सूरवात झाली व चौदाव्या शतकात ती पार रसातळाला गेली , अस्पृश्यता उदयास आली व बहुतांश माणसांचे जिणे मुश्किल झाले , स्त्रियांची अवस्था त्याहीपेक्षा भयाण झाली अश्या भयाण सामाजिक परिस्थितीत महात्मा फुले यांनी अठराव्या शतकात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कार्य सुरू केले व एक आधुनिक भारत घडविला म्हणून महात्मा जोतिबा फुले हे आधुनिक भारताचे जनक ठरतात असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
थोरगव्हाण तालुका रावेर येथील डी. एस.देशमुख माध्यमिक व उच्यमाध्यमिक विद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यावक्ता म्हणून भाषण करताना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की भारतात इंग्रजांनी शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला मात्र मुलींना , अस्पृश्य यांना शिक्षण देऊ नका म्हणून देशात मोठे आंदोलन झाले . इंग्रजांनी या प्रश्नावर काहीअंशी माघार घेतली तेंव्हा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणा करिता महात्मा फुले पुढं आले व त्यांनी शिक्षणा बरोबरच विविध सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी चळवळ सुरू केली . त्यांना प्रचंड विरोध झाला , त्यांना ठार करण्या करिता माणसं पाठविण्यात आली मात्र ते इंग्रजां प्रमाणे मागं हटले नाही , त्यांच्या सामाजिक सुधारणांनी आधुनिक भारताचा पाया रचला गेला .
थोरगव्हाण येथील शाळेमध्ये माजी आमदार आर. आर. पाटील यांची जयंती ते महात्मा फुले पुण्यतिथी असा संविधान सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्यात जागर संविधानाचा निर्धार व्यसनमुक्तीचा हा उपक्रम राबविण्यात आला . या कार्यक्रमाची सांगता जयसिंग वाघ यांच्या हस्ते करण्यात आली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्रा. संजय चौधरी होते . त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की , महात्मा फुले , सावित्री बाई फुले यांनी भारतात महिलांकरिता शैक्षणिक व सामाजिक कार्य खूप केले आहे ते कार्य आपल्याला चालू ठेवावे लागेल .
बालविकास अधिकारी जागृती तायडे यांनी मुलांच्या शिक्षनाचे कार्य आज कमी प्रमाणात होत असल्याने त्या करिता स्वयंसेवी संस्थांनी पुढं यावे असे आवाहन केले .
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी आंगणवाडी शिक्षिका आज कोण कोणत्या प्रश्नांना सामोरे जात आहेत याची माहिती दिली .
रजनी पाटील , उमाकांत बाउस्कर , पवन चौधरी , रामराव देशमुख , चंद्रकांत देशमुख , राजेंद्र देशमुख , कमलाकर चौधरी , मधुकर कोल्हे , प्रकाश बाविस्कर , नंदकुमार चौधरी , चंद्रकांत पाटील , रवींद्र चौधरी ई. संचालक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. के. पाटील , आभारप्रदर्शन एस. बी. सपकाळे यांनी केले .