नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अधिक प्रवासी प्रवास करू शकणार ; सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी आता १६ कोचेससह गाडी धावणार;

नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 20912/20911) साठीच्या वाढत्या मागणीचा विचार करून, रेल्वेने ही गाडी सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी १६ कोचेससह २४.११.२०२५ पासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 20912/20911 नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस आता विद्यमान ८-कोच रेकऐवजी १६-कोच संरचनेसह चालवणार.

आता या गाडीच्या ८ कोचेसमध्ये ५३० प्रवाशांच्या क्षमतेऐवजी १६ कोचेसमध्ये ११२८ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

नवीन कोच संरचना: २ वातानुकुलीत एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १४ एसी चेयर कार्स

नवीन कोच संरचना २४.११.२०२५ पासून इंदौर आणि नागपूर दोन्ही ठिकाणांहून लागू होणार आहे.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

उच्च वेग, सुरक्षेची उच्च मानके आणि आधुनिक प्रवास अनुभवामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोचसंख्या वाढल्यामुळे आसनक्षमतेत मोठी वाढ होईल, प्रतीक्षा यादी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

अपग्रेड केलेला रेक इंदौर –नागपूर–इंदौर या मार्गावर सेवाक्षमतेत वाढ आणि संचालन व्यवस्थापनात सुधारणा करण्यासही मदत करेल.