वंदे भारत गाड्या आता दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवरही थांबणार

वंदे भारत गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वेने प्रायोगिक तत्वाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे- हुबळी – पुणे वंदे भारत या गाड्यांना अनुक्रमे दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील पुढीलप्रमाणे:
22225/22226 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा दौंड येथे राहील.
गाडी क्रमांक 22225 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला २४.११.२०२५ पासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे २०.१३ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला २४.११.२०२५ पासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे ०८.०८ वाजता पोहोचेल.

20670/20669 पुणे – हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा किर्लोस्करवाडी येथे राहील.
गाडी क्रमांक 20670 पुणे – हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला २४.११.२०२५ पासून किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी किर्लोस्करवाडी येथे १७.४३ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 20669 हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला २४.११.२०२५ पासून किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी किर्लोस्करवाडी येथे ०९.३८ वाजता पोहोचेल.

दौंड आणि किर्लोस्करवाडी येथील प्रवासी आता त्यांच्या स्थानकांवरूनच वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढू किंवा उतरू शकतील.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

उच्च वेग, सुरक्षेची उच्च मानके आणि आधुनिक प्रवास अनुभवामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत उत्तम प्रतिसाद मिळत आहे