मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मानेगाव येथे एका व्यक्तीने आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला १९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली. या माहितीची खातरजमा करून जळगाव जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई करत ३३४ किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच प्रभार अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तात्काळ पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानेगाव येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान मनोज नामदेव घटे (वय ४०, रा. मानेगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या शेतातून ५१ गांजाची झाडे, एकूण वजन ३४१ किलो ५०० ग्रॅम, अंदाजे २३,२२,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच संदीप गावित, सुभाष ढवळे, , तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड, पोउपनि, सोपान गोरे, पोहेकी सुनिल दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, पोकों छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, रविंद्र चौधरी, चालक पोकों भरत पाटील तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, आशिष अडसूळ, सपानि जयेश पाटील, पोउपनि निलेश गोसावी, पोहेकॉ चंद्रकांत बोदडे, पोना मोतीलाल बोरसे, पोकों चेतन महाजन, रविंद्र धनगर, दिपक ठाकरे, गोविद पवार, श्रावण भिल, जितेंद्र महाजन यांनी केली आहे.आणि मुक्ताईनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.


