मनमाड स्टेशनवर 380 मेट्रिक टन वजनाचे 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी 44 गर्डर केवळ 640 मिनिटांच्या ब्लॉकमध्ये उभारले ;

मनमाड – मध्य रेल्वेची पायाभूत सुविधा क्षमता – मनमाड स्टेशनवर 380 मेट्रिक टन वजनाचे 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी 44 गर्डर, प्रत्येकी 31 ते 35 मीटर लांबीचे, केवळ 640 मिनिटांच्या ब्लॉकमध्ये उभारण्यात आले

मध्य रेल्वेच्या पथकाने मनमाड स्टेशनवरील १२ मीटर रुंदीच्या पादचारी पुलासाठी (FOB) गार्डर्सचे यशस्वी स्थापन (लॉंचींग) केले. ३१ ते ३५ मीटर लांबीचे आणि ४ रेल्वे मार्गांवर पसरलेले ४४ गार्डर्स बसविण्याचे काम १२ ते १६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत केवळ ६४० मिनिटांत विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले. या बांधकामासाठी ३८० मेट्रिक टन तयार स्टीलचा वापर करण्यात आला.

या प्रकल्पाची अंमलबजावणी अत्याधुनिक क्रेन्सच्या साहाय्याने करण्यात आली, ज्यामध्ये ५०० मेट्रिक टन क्षमतेचा मुख्य क्रेन आणि ३५० मेट्रिक टन क्षमतेचा स्टॅंड-बाय क्रेन यांचा समावेश होता. तसेच १५२ मेट्रिक टन काउंटर-वेट ऑपरेशनदरम्यान दोन वेळा हलविण्यात आला. या कार्यादरम्यान, दिवसाच्या वेळी स्पॅन क्र. २ आणि ३ वरचा जड रेल्वे वाहतूक दाब, क्रेन आणि सुपर-लिफ्टचे प्लॅटफॉर्म्स व रस्त्याची सीमा, स्थानांतर, इत्यादी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, टीमने सर्व आव्हानांवर मात करत १२ ते १६ नोव्हेंबर२०२५ या कालावधीत हे काम सुरक्षितरीत्या पूर्ण केले.

या प्रकल्पाची अंमलबजावणी भुसावळ विभागातील ऑपरेटिंग, अभियांत्रिकी, ट्रॅक्शन, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन तसेच गती शक्ती युनिट या अनेक विभागांच्या समन्वयातून शक्य झाली. अधिकाऱ्यांनी, साइट-इंजिनिअर्स, पर्यवेक्षक, क्रेन ऑपरेटर्स, कर्मचाऱ्यांनी तसेच पीएसएसए (PSSA) कर्मचाऱ्यांनी अखंड परिश्रम करून प्रत्येक गर्डर अचूकपणे बसविला आणि कोणताही ब्लॉक तुटू न देता काम पूर्ण केले.

एफओबीचे यशस्वी प्रक्षेपण हे टीमच्या कौशल्य, नियोजन आणि अंमलबजावणी क्षमतेचे प्रतीक आहे