भुसावळ (प्रतिनिधी) : ढोल-ताशांचा जोरदार गजर, प्रत्येक भाजपेयीच्या गळ्यात भाजपाचा गमछा व डोक्यावर भगवी टोपी, कार्यकर्त्यांच्या हातात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे यांचे कट आऊट तसेच भाजपाचे झेंडे घेवून विराट शक्ती प्रदर्शन करीत भाजपाच्या उमेदवार सौ.रजनी संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ भाजपाने सोमवार, 17 रोजी प्रचार रॅली काढली. तत्पूर्वी जामनेर रोडवरील दर्डा भवनाच्या जागेवर प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आल

भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
सोमवार, 17 रोजी सकाळी 11.30 वाजता भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
भाजपाचे विराट शक्ती प्रदर्शन
जामनेर रोडपासून भाजपाने प्रचार रॅलीला सुरूवात केली. यावेळी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्या छायाचित्रांचा कट आऊट असलेले वाहन अग्रभागी व त्यानंतर भाजपेयींनी गळ्यात भाजपाचा गमछा, डोक्यावर भगवी टोपी तसेच अनेकांनी फेटा परिधान केल्याचे दिसून आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, भाजप उमेदवार सौ.रजनी सावकारे यांचे कट आऊट तसेच भाजपाचे झेंडे घेवून कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत भाजपाच्या विजयाच्या घोषणा दिल्या तर अग्रभागी ढोल-ताशा पथकाने लक्ष वेधले. शक्ती प्रदर्शनाच्या या रॅलीत भाजपाचे सर्व माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच शहरातील विविध प्रभागातून इच्छूक असलेले उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. , भाजपाचा झेंडा फडकणार- मंत्री सावकारे
मंत्री संजय सावकारे यांच्याशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने संवाद साधल्यानंतर ते म्हणाले की, भाजपाच्या या रॅलीत सर्व जाती-धर्माचे लोक तसेच भाजपाचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत, जनादेश आमच्या बाजूने असल्याने निश्चितपणे भुसावळ पालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल यात शंका नाही, असेही मंत्री संजय सावकारे म्हणाले.
संधी मिळाल्यास भुसावळचा कायापालट करणार : सौ.रजनी सावकारे
भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.रजनी सावकारे यावेळी म्हणाल्या की, भुसावळ शहराची रहिवासी असल्याने या शहरातील समस्यांची जाण आहे. भुसावळकरांनी कौल दिल्यानंतर शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासोबत शहराचा निश्चितपणे कायापालट करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


