भुसावळात अजित पवार गट स्वबळावर लढणार : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे –

भुसावळ (प्रतिनिधी : भुसावळ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी येथे केली. पक्ष कार्यालयात रविवारी सायंकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही 50 जागांवर उमेदवार उभे करणार असून नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा देणार असून सोमवारी फार्म भरल्यानंतर आम्ही उमेदवाराचे नाव जाहीर करू.


अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, आम्ही युतीकडे प्रस्ताव दिला होता मात्र भाजपाकडे इच्छूकांचे प्रमाण अधिक असून आमच्या कार्यकर्त्यांचा बळी द्यायला नको म्हणून आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे त्यामुळे त्यांनाही निवडून यायला हवे, असे वाटते त्यामुळे आम्ही 50 जागांवर उमेदवार देणार असून नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा समोर आणणार आहोत मात्र फार्म भरल्यानंतर आम्ही अधिकृतरित्या उमेदवाराचे नाव जाहीर करू.
अजित दादांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून आव्हाने पेलण्यास आम्ही समर्थ असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.