सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पाटील यांची निवड

जळगांव (प्रतिनिधी ) – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा जिल्हा प्रकल्प कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगांव यांच्या तर्फे स्वच्छ व हरित विद्यालयाचे मुल्यांकन केले जाणार असुन त्या मुल्यांकन समिती सदस्य म्हणुन नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ मनीषा पाटील यांची मुल्यांकन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलीं आहे सदर समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे.