चेन्नई विद्यापीठात मलखांब खेळाडू सचिन जोहरे आणि तुषार जोहरे यांची उत्कृष्ट कामगिरी ; रौप्य पदके पटकावली ;

भुसावळ (प्रतिनिधी व) – चेन्नई विद्यापीठात अखिल भारतीय मलखांब विद्यापीठ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भुसावळ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मलखांब खेळाडू सचिन जोहरे आणि तुषार जोहरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर रौप्य पदके जिंकली आणि महाविद्यालय आणि विद्यापीठाचे नाव उंचावले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, डॉ. दीपक पाटील आणि महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक भगवान तायडे यांनी त्यांचा सत्कार केला, त्यांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्कार समारंभाला जिमखाना विभागाचे क्रीडा संचालक डॉ. आनंद उपाध्याय, प्राध्यापक अख्तर खान, श्री. तेजस झोपे आणि महेश तळेले आणि चेतन सोनवणे उपस्थित होते.