भुसावळ (प्रतिनिधी) : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदावव सुव्यवस्था अबाधित राहून शांततेत व निर्भयपणे निवडणुकी पार पडाव्या यासाठी पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. उपद्रवींवर सातत्याने कारवाई होत असतानाच पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर शहरात मंगळवारी 11 रोजी मध्यरात्री शहरातील विविध भागात कोम्बिंग राबवण्यात आले. त्यात दोन हद्दपार आरोपी आढळल्याने त्यांना अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर आर्म अॅक्टसह दोन वॉण्टेड गुन्हेगारांवरही कारवाई करण्यात आली.
हि कारवाई भुसावळचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, शहर निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात सहा अधिकारी, भुसावळ शहरचे पाच अंमलदार, भुसावळ बाजारपेठचे 30 अंमलदार, गुन्हे शाखेचे 30 अंमलदार व आरसीबीच्या पाच प्लॉटून कारवाईत सहभागी झाल्या.
कारवाईत संदीप बुधा खंडारे (24) व शम्मी प्रल्हाद चावरीया (29) या दोघांनी हद्दपारीचे उल्लंघन केल्याने त्यांना अटक करण्यात आली तर शुभम दिलीप पचेरवाल (26) कडे चाकू आढळल्याने त्याच्याविरोधात आर्म अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आली. संशयास्पदरित्या फिरणार्या एकाविरोधात कारवाई करण्यात आली तसेच नऊ एनबीडब्ल्यू वॉरंटची, 10 बीडब्ल्यू वॉरंटसह 72 समन्सची बजावणी करण्यात आली. योवळभ नऊ हद्दपार आरोपी तपासण्यात येवू 90 रेकॉर्डवरील आरोपी तपासण्यात आले.
भुसावळ लोहमार्ग पोलिसांना मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपी सादीक अली नियाज अली यास अटक करण्यात आली व त्याच्या अटकेनंतर दोन गुन्हे उघडकीस आले तसेच एमआयडीसी पोलिसांना वॉण्टेड मरियमला अटक करून तिला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



