भुसावळात जिल्हाधिकार्‍यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी , निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर केल्या सूचना :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिका निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शुक्रवारी दुपारी भुसावळ येथील मतदान केद्रांची पहाणी करून पालिका कार्यालयात पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेत त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सूचना केल्या.

अचानक जिल्हाधिकार्‍यांची भेट
शुक्रवारी दुपारी अचानक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी खडका रोडवरील मतदान केद्रांची पाहणी केली. मतदान केंद्राबाबत सूचना केल्यात. मतदान केद्रांची पाहणी केल्यानंतर त्यांनी नगरपालिका कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी आचार संहितेचे काटेकोर पालन करावे, मतदान केंद्रांची तातडीने पाहणी करावी, अश्या सूक्त सूचना केल्या.