भुसावळ (सा वा) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याकरिता वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी शहरातील ग्रीन लिप्स हाॅटेलच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडी भुसावळ शहरातील तळागाळातील वंचित समुहाच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी अनेक विषयाला धरून आंदोलने मोर्चे केलेत शहरात होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केलीत. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकदीने निवडणूकीच्या रिंगणात उतरत आहे.
भुसावळ नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी ७ नोव्हेंबर रोजी यावल रोडवरील महात्मा गांधीं यांच्या पुतळ्या जवळील ग्रीन लिप्स हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्हाध्यक्ष शमीभाव पाटील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाळा पवार यांनी केले आहे. भुसावळचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (एस्सी) महिलांसाठी राखीव आहे. पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ची उमेदवारी वंचित बहुजन आघाडी ठरवतील. तसेच भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षासोबत सन्मानपूर्वक तडजोड करून आघाडी करण्यास दोन पाऊल पुढे येऊन आघाडी करण्यास तयार आहे. असे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी सांगितले. तसेच अन्यायाविरुद्ध ज्यांनी वेळोवेळी मोर्चे आंदोलन करून जनतेसाठी रस्त्यावर उतरून समाज कार्य केले अशा युवकांना उमेदवारी देण्यास प्राधान्य दिले जाईल असे देखील बाळा पवार यांनी सांगितले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे वंदना आराक मिराबाई वानखेडे बबन कांबळे प्रा. सुनिल सुरवाडे निलेश जाधव दिनेश नरवाडे रूपेश साळुंखे किशोर सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



