भुसावळ (प्रतिनिधी) : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे नगरपरिषद निवडणुकीकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात होणार आहेत.
संबंधित मुलाखतीच्या अगोदर प्रत्येक इच्छुक उमेदवाराला आपले इच्छूक उमेदवारी अर्ज भरणे बंधनकारक आहे. हे अर्ज मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छूकांनी गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन भुसावळ भाजपातर्फे दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी केले आहे.



