नागपूर – : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना नागपूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सहावीत शिकणार्या मुलीवर लॉजमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. शहराच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत राहणार्या चिमुकलीसोबत ही संतापजनक घटना घडली.
आरोपींनी पीडीतेवर अत्याचार करतानाचे व्हिडीओ काढले. सोबतच कुणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल आणि जीवे मारण्याची धमकी हि दिली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी करण आणि रोहीत या दोन आरोपींना अटक केली. दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे व दोघांवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी ही अत्याचाराची धक्कादायक घटना घडली असून शुक्रवारी सायंकाळी पिडीतेच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


