भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत : दोन जणां विरोधात गुन्हा –


भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गोकुळ टी जवळ दोघे तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांच्या विरोधात शस्त्र अधिनियम अंतर्गत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांच्या माहितीनुसार, 8 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता बाजारपेठ परिसरात केवल अनिल टाक (30, रा.वाल्मीक नगर, भुसावळ) व शिवा जगदीश पथरोड (30, रा.वाल्मीक नगर, भुसावळ) हे तीक्ष्ण धारदार तलवार घेऊन फिरत होते. याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तलवार जप्त केली.

याप्रकरणी पोलिसांनी आर्म्स अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत सोनार व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.