भुसावळ (प्रतिनिधी ) – मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आणि रोटरी क्लब भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने ज्ञान ज्योती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा खडका येथील ज्ञान ज्योती शाळेत मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा या संस्थेच्या एका ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त विशेषतः दहावी ते 12 वी च्या विद्यार्थांसाठी त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या शैक्षणिक टप्प्यात त्यांना चांगले यश प्राप्त होण्यासाठी, यश निश्चय आणि अभ्यासाच्या युक्त्या या विषयावर मनशक्तीचे साधक गिरीश पाटील यांनी मार्गदर्शन केले,


आयुष्यात चांगले यश प्राप्त करण्यासाठी एक चांगल्या ध्येय ठरवून,त्याचा निश्चयाचे रोपण आपल्या मनात करून त्याला प्रयत्न, सातत्य,एकाग्रता,नियोजनाची जोड देऊन चांगले यश प्राप्त होईल,तसेच कठीण विषया चा सोप्या पद्धतीने कसा करावा या बद्दल मार्गदर्शन केले. शाळेच्या सर्व 300 विद्यार्थ्यांना मनशक्ती तर्फे प्रयत्न रहस्य हे पुस्तक विनामूल्य देण्यात आले.तसचे रोटरी चे प्रेसिडेंट यांनी पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच रोटरी क्लब तर्फे शाळेच्या परिसरात वृक्षरोपण शाळेचे मुख्यध्यापक पी यु बाविस्कर आणि रोटरी प्रेसिडेंट संजय चापोरकर यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात मनशक्ती साधक विजया निकम ,अशोक निकम, तसेच रोटरीचे सेक्रेटरी श्री क्षीरसागर, डिस्ट्रिक्ट ऐनक्लेवचेअर जी आर ठाकूर, आणि उपस्थित सर्व रोटरी सदस्यांचे सहकार्य लाभले. तसेच ज्ञान ज्योती शाळेचे मुख्याध्यापक पी यू बाविस्कर आणि सर्व शिक्षक वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले.


