भुसावळातील साबीर शेख 30 वर्षांपासून जपताय सामाजिक ऐक्य ;

भुसावळ (प्रतिनिधी) : बहीण भावाचे अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षा बंधन होय . देशभरात हा सण शनिवारी मोठ्या धूम-धडाक्यात साजरा झाला भुसावळ शहरातही हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या अतूट रेशीम धाग्याच्या पवित्र बंधनात आजही एका हिंदू बहिणीने मुस्लीम भावाला राखी बांधून जातीय सलोखा जपला.असून रक्ताचे नातं नसतांनाही भाऊ बहिणीचे रक्षणासाठी आजही कसा पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे येथे दिसून येत आहे . गेल्या ३० वर्षांपासून बहीण भाऊ हक्काने राखी बांधून हे ऐक्य जपत आहेत
भुसावळ शहरातील पंधरा बंगला भागातील रहिवासी सुमन वराडे (मूळ रा.नाशिक) या सुमारे 30 वर्षांपासून माजी नगरसेवक व हिंदू-मुस्लीम एकता मंच अध्यक्ष साबीर शेख यांना राखी बांधताय. वराड यांच्या भावाचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. यावेळी साबीर शेख यांनी त्यांना धीर देत भाऊ गेला असलातरी दुसरा भाऊ पाठीराखा असल्याचे म्हणत रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यास सुरूवात केली. गेल्या 30 वर्षांपासून साबीर शेख हे राखी बांधत आले आहेत. यावेळी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रार्थनाकरून , जिस किसी हिंदू बहन का भाई नहीं है तो हाजीर है मेरी कलाई, असा संदेशही यानिमित्ताने माजी नगरसेवक साबीर शेख यांनी या माध्यमातून दिला आहे. देशात ऐक्य नांदावे, शांतता रहावी, मुस्लीम एकोपा टिकून रहावा, अशी प्रार्थनाही त्यांनी यानिमित्ताने या दिवशी केली.भुसावळातील हिंदू मुस्लिम ऐक्याच्या रक्षाबंधनाचे आजही सर्वत्र कौतुक होत आहे.