भुसावळ (प्रतिनिधी ) – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने रक्षाबंधन या सणानिमित्त संत गाडगेबाबा केंद्र येथे आजोबां सोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

ज्यांना कुणाचा आधार नाही ते वृद्ध बेघर निवारा केंद्र या ठिकाणी वास्तव्यास आहे. आपण सारे सण साजरे करतो परंतु ज्यांना आधार नाही अशा आजोबांसोबत नारीशक्तीने शनिवार ९ रोजी रक्षाबंधन हा बहिण भावाच्या पवित्र आणि प्रेमाच्या नात्याचा सण साजरा केला. यावेळी नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषा पाटील सचिव श्रीमती ज्योती राणे कोषाध्यक्ष रेणुका हिंगु या उपस्थित होत्या. बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक मनोज कुलकर्णी व काळजीवाहक राजेंद्र मराठे यांचे अनमोल सहकार्य लाभले.


