अंतर्नाद प्रतिष्ठान,भुसावळ आयोजित निःशुल्क गणेश मूर्ती कार्यशाळा 2025 चे आयोजन ;

शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करु या.”

भुसावळ (प्रतिनिधी )- गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळेच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण पुरक गणेशमुर्ती घरी तयार करून सुंदर रंगवून त्याच मुर्तीची स्थापना करावी हाच या कार्यशाळेचा शुद्ध हेतू आहे.
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक गणेशोत्सव म्हणून साजरा करूया या उद्देशाने कार्यशाळेत सहभागी व्हा

महत्वाच्या सूचना :1) वयोगट : इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचेच विदयार्थी कार्यशाळेत सहभागी होवू शकतील. , भिजवलेले मातीचे गोळे अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे मोफत देण्यात येतील.3) कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विदयार्थ्यानी सोबत छोटा मग , पॅड किंवा पाटी, दोन खराब कापड, खराब पेन किंवा बारीक स्क्रू ड्रायव्हर, दोन रद्दी पेपर, प्यायला पाणी बॉटल, सोबत आणायची आहे.4) सर्वोदय स्टेशनरी, जवाहर डेअरी जवळ, डेली बाजार, भुसावळ येथे गणपती बनवण्याचा टुल बॉक्स मिळतो, ज्यांना शक्य असेल आणि इच्छा असेल त्यांनी तो विकत आणावा. ( दोन प्रकारचा मिळतो 5) कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करावे. लिंक मध्ये सर्व माहिती इंग्रजीतून भरावी. मराठीत कुणीही भरू नये.
Registration Link:-
https://forms.gle/TawGtSDyPHMkKKFM8

लिंकच्या शेवटी व्हॉटस् ॲप ग्रुप लिंक दिलेली आहे. तिला क्लिक करून ग्रुप जॉईन करावा. 6) पहिल्या 175 रजिस्ट्रेशन करण्याऱ्या विद्यार्थ्यांनाच संधी असेल. 175 रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक बंद करण्यात येणार आहे त्यानंतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, तसेच रजिस्ट्रेशन सुद्धा केले जाणार नाही.7) येतांना घरूनच भरपूर जेवण करून यावे तसेच सोबत थोडा नाश्ता डब्यात आणावा.8) दिलेल्या वेळेच्या 10 मिनिटे आधी हजर राहावे. उशिरा येणाऱ्यांना पुनश्च पहिल्यापासून मार्गदर्शन केले जाणार नाही.9) एक कुटुंब एक गोळा दिला जाणार आहे त्यामुळे एका कुटुंबातून एकाच मुलाचे रजिस्ट्रेशन करता येईल.

प्रशिक्षक म्हणून
श्री.हितेंद्र नेमाडे सर ( BFA – Painting ) भुसावळ असून कार्यशाळा दिनांक : 17 ऑगस्ट 2025 रविवार रोजी
वसकाळी 10:00 ते 1.00 वाजता.
लोणारी समाज मंगल कार्यालय, रिंग रोड, येथे कार्यशाळा आहे

गुगल मॅप (स्थळ ) :
https://maps.app.goo.gl/157Z86x3KqxnjziM8?g_st=ac

प्रकल्प प्रमुख
कुंदन वायकोळे
7588816905
समन्वयक
राहुल भारंबे
9028483542
सह समन्वयक
विपिन वारके
9527287784
ज्येष्ठ पत्रकार, दिव्य मराठी
श्रीकांत सराफ
9881418580

   *उपक्रम समिती*

ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदिप सोनवणे, संजू भटकर, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, समाधान जाधव, राजेंद्र जावळे, देव सरकटे, राजू वारके, हरीश भट, प्रा.श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन, भूषण झोपे,उमेश फिरके, चंद्रकांत सूर्यवंशी, ललीत महाजन, केतन महाजन, कपिल धांडे , शिरीष कोल्हे, प्रमोद पाटील, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे, मंगेश भावे.

संदिप वसंतराव पाटील –

7588009492 , 9209248392

अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ.