भुसावळ ( प्रतिनिधी ) –
प्रसार माध्यमांची वेगाने प्रगती होत आहे त्याचप्रमाणे माध्यमांची विश्वासार्हता सुद्धा घसरत असल्याने पत्रकारिता करताना मूल्यधिष्टीत व समाजाभिमुख पत्रकारिता करावी असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे मीडिया विंगचे प्रमुख शांतनूकुमार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे . तसेच
भुसावळ येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्रात आयोजित पत्रकारांच्या स्नेह मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना शांतनूकुमार यांनी सांगितले .

प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्रात आयोजित कार्यक्रमात बि .के सिंधू बहन ,ज्योती बहन , कविता बहन व नाना पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होत याप्रसंगी शांतनुकुमार यांनी सांगितले की प्रसार माध्यम हे समाजातील प्राण निर्माण करणारे आहे प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करण्याची जबाबदारी आता प्रसार माध्यमावर आहे . कारण लोकशाहीच्या तिन ही आधार स्तंभावर अकुंश ठेवण्याचे व सत्य स्थीती जगापुढे आणण्याचे काम पत्रकार करतात .आज समाजात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक भाव पसरविला जात आहे चिंतात्मक परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे एकीकडे हिंसाचार वाढत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही बाबी सगळीकडे लगेच पसरवल्या जातात त्याचे परिणाम आपण सर्वजण जाणत आहात यासाठी आपल्या पत्रकार बांधवावर खूप मोठी जबाबदारी आहे समाजाला सकारात्मक तेचा विचार मांडणे हे आपल्या पत्रकाराची जबाबदारी आहे आणि ती आपण करत आहात असेही ते म्हणाले

कार्यक्रमाचे प्रारंभी दीप प्रज्वलन करून सर्व पत्रकार बंधूंचे व अतिथींचे स्वागत सेवा केंद्र तर्फे करण्यात आले त्यानंतर सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने बि के शांतनू भाई यांचा सत्कार वृक्षाचे रोप शाल व फेटा चढवून करण्यात आला त्यानंतर सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका बीके सिंधू दीदी यांचाही सत्कार पत्रकार बंधून तर्फे करण्यात आला.
यावेळी ब्र.कु सिंधु बहन यांनी सांगितले कि ब्रम्हाकुमारी सर्व धर्माचा आदर करते . शोषीतांना न्याय देण्याचे काम पत्रकार करतात भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी मदत करा .
यावेळी कविता बहन व ज्योती बहन यांनीही पत्रकार समाजाचा आरसा असून दिवस रात्र बातमी साठी मेहनत करतात त्यांनी कुटुंबाला सुद्धा वेळ दयावा असे आवाहन केले . तर बीके सिंधू दीदी यांनी सर्व पत्रकार बंधूंना मार्गदर्शन केले व परिवारासह माउंट आबू इथे होणाऱ्या संमेलनासाठी जाण्याचे आवाहन केले . नाना पाटील सर यांनी समन्वयक म्हणून उत्तम कार्य करून मार्गदर्शन केले .तर जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी सर यांनी पत्रकारांशी वार्तालाप करत मनोगत व्यक्त केले . पत्रकार बांधवांचे अहोरात्र काम सुरूच असते ओघाने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो याकरिता पत्रकार बांधवांनी मेडीटेशन अवश्य करावे सकारात्मक पत्रकारिता जपण्यासाठी माउंट अबू येथे एकदा तरी अवश्य भेट द्यावी व अनुभव घ्यावा असे आवाहन केले
यावेळी दै सकाळचे निलेश फिरके दै सामना व साप्ताहिक सातपुडा कन्याच्या संपादिका उज्वला बागुल दैनिक आव्हान चे पत्रकार संजीव कासिव देशदूत चे उपसंपादक मनोहर लोणे सर लोकमतचे राकेश कोल्हे व वासिफ पटेल सकाळचे श्रीकांत जोशी सर डॉ जगदीश पाटील सर, आयबीएन चॅनेल चे विशाल सूर्यवंशी नाना पाटील सर आदींसह गोपाल भाई भरत भाई दिलीप भाई व अन्य बीके परिवार उपस्थित होते यावेळी कार्यक्रमातील सूत्रसंचालन बीके ज्योती दीदी आभार बी के अनिल भाई मेडिटेशन बीके कविता बहन यांनी केले . प्रसंगी पत्रकारांना राख्या बांधण्यात येवुन सन्मान करण्यात आला .


