भुसावळ (प्रतिनिधी ) – कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष,शिवसेनेचे मा खासदार विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव,कार्याध्यक्ष संजयजि जोशी यांच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रेल कामगार सेना भुसावळ मंडळ तर्फे ऑगस्ट जागतिक क्रांती दिना निमित्त दि ८ रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजे पर्यंत भुसावळातील डीआरएम कार्यालय मुख्य प्रवेश द्वाराजवळ धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात मगरूर प्रशासनाला विचारण्यासाठी व कामगारांच्या ज्वलंत व प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन केलेलं आहे.

उद्या या धरणे आंदोलनासाठी रेल कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भुसावळ विभागातील सर्व अन्यायग्रस्त कामगार बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धरणे आंदोलन यशस्वी करावे.प्रशासनातर्फे या सर्व ज्वलंत व प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी रेल कामगार सेनेला सहकार्य करावे व आपला पाठिंबा दर्शवावा असे आवाहन रेल कामगार सेना भुसावळ तर्फे करण्यात आले आहे
सर्व रेल कर्मचाऱ्यांना ललितकुमार मुथा सह ,राजेश लखोटे,प्रीतम टाक,विनोद वाघे,योगेश माळी,अरविंद थोरात,कमलाकर बनाईत,मुकेश महाजन,एम के शहा,प्रकाश करसाळे,आर एस पाठक,जि एस पाटील,विजय तायडे,गोपाल बाबुराव,अनिल आहेर,देवेंद्र गुरव,भरत शर्मा,संजय चौधरी,मोहन राजपूत,पी व्ही ठाकरे,पंकज ठाकरे,सुरेश लक्ष्मण दरेकर,महेंद्र सोनवणे,प्रकाश मोहिते,मुकुंद मोरे,एल टी आदबाने,योगेश अंभोरे,संदीप जावळे,संतोष देशमुख,मनोज गावंडे,निलेश गेडाम,प्रकाश सोनटक्के,के के मालपाणी,संजय मालपुरे,रमेश मोटे,संदीप लोहार,पदमसिंग नीटपरदेशी,अनिल मासरे,आर एस पाटील,जालिंदर मोरे,दिनेश सोनवणे,गुफरान खान,संतोष पाटील,एजाज सय्यद,राजेश गोडबोले,भारत पाटील,सुभाष सोनवणे,संदीप नगरे,रामदास आवटे,प्रदीप भूसारे,सुरेंद्र यादव,मंगू शेलोडे,शांताराम सपकाळे,शंकर कुमावत,गोपीनाथ मोरे, विरकुमार ममेय्या व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन यशस्वितेसाठी परिश्रम करीत आहेत


