भुसावळ (प्रतिनिधी )- भावसार क्षत्रिय समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बक्षीस समारंभ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भावसार क्षत्रिय समाजाचे समाज अध्यक्ष श्रीराम देवताळू होते व प्रमुख पाहुणे .मोतीलाल शिंपी होते महिला अध्यक्ष सौ. मधुमती भावसार, श्रीमती आशालता नवलपुरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस. पी. भावसार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली. त्यानंतर समाजातील दिवंगत समाज बांधव ,ज्ञात ,अज्ञात व्यक्ती, पहेलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले व्यक्ती, तसेच अहमदाबाद विमान अपघात मध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेचे मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन हे श्री.दिलीप वाघमारे यांनी केले. जमाखर्चाचे वाचन रमेश पांडव यांनी केले. ऐनवेळी येणारे या विषयावर समाज अध्यक्ष श्रीराम देवताळू यांनी समाज बांधव यांना संबोधवीत करताना प्रत्येक समाज बांधवांनी समाज संघटित करण्यासाठी समाजातील प्रत्येक युवक , समाज बांधव यांनी सुखदुःखाच्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून योगदान करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अंतर्गत महिला मंडळ आयोजित “सायबर क्राईम”या विषयावर रमेश पांडव यांनी इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया वापर करीत असताना महिलांनी सतर्क राहावे. याबाबत मार्गदर्शन केले. ज्युनिअर के.जी. ते पदवीधर , डिप्लोमा, बी. टेक पर्यंत च्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांचा विविध बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. श्रीमती आशा लता नवलपुरे यांच्या तर्फे प्रत्येक वर्षी ज्युनिअर के.जी. ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस देण्यात आले. तसेच समाजातील समाज बांधव त्यांच्या स्वर्गीय आई-वडिलांच्या पित्यर्थ समाज बांधव विद्यार्थ्या च्या बक्षिसासाठी प्रायोजक म्हणून बहुमूल्य असे सहकार्य सतत करीत आहे.
महिला मंडळाचे अध्यक्षा सौ. मधुमती भावसार यांनी समाजातील महिलां करिता नवीन प्रकारचे उपक्रम सुरू करणे बद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमांतर्गत शिंपी काका यांच्या लग्नाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल . मोतीलालजी शिंपी काका यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भावसार समाजाचे भीष्म पितामह श्री संत काका या वयात सुध्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देतात त्यांचा सत्कार सर्व कार्यकारणी सदशय मार्फत करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेश पांडव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारणी ,महिला मंडळ, एस. पी.भावसार, दिलीप वाघमारे, सूर्यकांत साखरे, जगदीश भावसार, रमेश पांडव, निलेश भावसार या समाज बांधव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमानंतर सर्व समाज बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला.


