विधी सेवा समिती अंतर्गत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – विधी सेवा समिती अंतर्गत भुसावळ शहरानजिक असलेल्या कंडारी येथील विघ्नहर्ता गणपती मंदिर जवळ महादेव टेकडी नजिक, वस्तीवर (pLv )अधिकार मित्र सौं संगीता राजेंद्र भामरे यांनी महिलांना कायदेविषयक महत्व पटवून देत सार्वजनिक उपयोगिता सेवा आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बाबत सविस्तर माहिती दिली . यावेळी मोठ्या संख्येने महिलां उपस्थित होत्या .

शेतकरी , कष्टकरी , आदिवासी व वडार, भिल समाजातील महिला गृहिणी यांना २० जुलै रोजी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बाबत सविस्तर माहिती दिली तसेच कायदा म्हणजे काय ? कायद्याचे नेमके फायदे काय आपण कायद्याचा आधार केव्हा व कसा घेऊ शकतो आदीवर बाबीवर माहिती देत सौं संगीता भामरे यांनी प्रकाशझोत टाकला . प्रसंगी कायदेविषयक माहिती पत्रक वाचून महत्व पटवून दिले व पत्रक वाटप केले . महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला