भुसावळात आदिवासी मन्नेवार समाजातर्फे आखाडी पूजन ; पोतराज मिरवणुकीने वेधले लक्ष ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रती वर्षाप्रमाने यंदाही जळगाव जिल्हा आदिवासी मन्नेवार समाज भुसावळ यांच्या वतीने आषाढ महिन्यात रविवार रोजी आखाडी पूजेचे आयोजन करण्यात आले होते, यंदाही पूजेकरिता महू येथून पोतराज आले होते. त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली . शहरातील शिवाजीनगर ते 15 बंगला पर्यंत वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे मुख्य केंद्रबिंदू पोतराज ठरले .

यावेळी भुसावळ मन्हेवार समाजाचे अध्यक्ष , सुरेश वाघमारे उपाध्यक्ष जय भंडारी सचिव गोपाल म्यांद्रे सहसचिव सुनील तल्लारे कोषाध्यक्ष देवेंद्र पोगल्लु सह कोषाध्यक्ष कुणाल एन्मेकर सल्लागार गणेश बत्तुलु अशोक मासेमार सदस्य विजय पुल्लीगिरी तुषार सुरे सोनु गणकर हरीश पुल्लेवार मनिष एन्मेकर हरीश बत्तुलु आदित्य बारसे हेमंत मलेल्लु यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.