भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ नगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालयावर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलला मिटर बसविण्यात आलेले नसल्यामुळे शहरवासियांना लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने नागरिकांचे नाहक नुकसान होत आहे तरी संबंधितांनी त्वरित या सोलर पॅनलला मिटर बसवावे अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली आहे याबाबत सानप यांनी म.रा.वि.मं.चे कार्यकारी अभियंता यांना दि.23 जुलै रोजी निवेदनाद्वारे कार्यवाही करण्यासाठी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मागणी केली आहे. तसेच सदर कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याबाबत भुसावळ येथील कार्यकारी अभियंता श्री.भामरे यांना दि.23 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, भुसावळ शहरातील नगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालय येथे तात्काळ मीटर बसविण्याबाबत निवेदन सादर केले. बर्याच दिवसापासून जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालयावरती लाखो रूपये खर्च करून सोलर पॅनल बसविण्यात आलेले आहेत. मात्र सदरील ठिकाणी मीटर नसल्यामुळे भुसावळकरांना लाखो रूपयांचा भुर्दंड होत आहे. तरी याठिकाणी तात्काळ मीटर बसविण्याचे आदेश देवून योग्य ती कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला आपल्या म.रा.वि.मं. या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा केदार सानप यांनी निवेदनाद्वारे दिला आहे याबाबत कार्यकारी अभियंता श्री.भामरे यांना समक्ष भेटून दिला आहे. तसेच याबाबत झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव मिळावी अशीही मागणी श्री.सानप यांनी निवेदनात केली आहे.



