तालुका विधी समितीच्यावतीने बालअनुकूल कायदेशीर सेवा या विषयातंर्गत विद्यार्थ्याना मार्गदर्शन ; तालुक्यातील न्याती हायस्कूल कंडारी मध्ये कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) तालुका विधी समितीच्यावतीने ALSA- मुलांसाठी बाल – अनुकूल कायदेशीर सेवा या विषयातर्गत कंडारी येथील शाळा स्व, विजयाबाई शंकरलाल न्याती हायस्कूल येथे सोमवार २१जुलै रोजी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनींना पीएलव्ही व अधिकार मित्र सौ संगिता राजेंद्र भामरे यांनी कायद्याअंतर्गत मुलांकरीता व मुलींच्या हितरक्षणार्थ अनेक कायदे केलेले आहे असे सांगून त्या कायदे विषयीं सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थित मुलींना गुड टच व बँड टच काय असते , मोबाईल स्मार्टफोनच्या अति वापरामुळे दुष्परिणाम कसे होत आहेत याबद्दल माहिती हे दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम समुपदेशन केले .

तसेच NALSA कशा पद्धतीने मदत करते याविषयी शिक्षक व विद्यार्थीनिना सविस्तर माहिती दिली विधी सेवा प्राधिकरण समांतर समिती मार्फत अनेक कायदेशीर कारवाई कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात येते याची सखोल माहिती पत्रक वाचुन व पत्रक वाटुन केली .

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सुर्यभान पाटील, सौ माधुरी अनिल जावळे उपशिक्षिका व सौ बबीता सलिम तडवी तसेच ललित बहाळे, संदीप रूपचद पाटील ,दिपक बाळकुषण झंवर व दुशत बाळू नायदे व भरत मोहन चौधरी व मालु ताई नरवाडे इ 50ते 70 विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते