भुसावळ (प्रतिनिधी ) : माहेश्वरी नववयुवती प्रतिभा संगठन कोलकात्ता यांच्या वतीने उमा श्रीरत्न विभूषण पुरस्कार भुसावळच्या बियाणी एज्युकेशन ग्रुपचा सेक्रेटरी डॉ.संगीता मनोज बियाणी यांना कोलकात्ता येथे देण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय माहेश्वरी समाजाच्या माजी अध्यक्षा शोभा सादनी,राष्ट्रीय महामंत्री ज्योती राठी,मिस युनिव्हर्स रूपा माहोता,वर्षा दगा,रश्मी बिनानी,समाज अध्यक्षा कोलकात्ता प्रिया परिवाल,सेक्रेटरी शारदा मोहता,ट्रेझरर दिव्या कोठारी,निशा राठी,शिल्पा झवर,सुषमा लढ्ढा,शितल बागरी, गरीमा दमानी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी भारतातील चार ते पाच महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फोटो ओळ – कोलकत्ता येथे माहेश्वरी नवयुवती प्रतिभा संघटन यांच्यावतीने डॉ.संगीता बियाणी यांना उमा श्रीरत्न विभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करताना शोभा सादनी,ज्योती राठी,रूपा मावता ,वर्षा दगा,रश्मी बिनानी,प्रिया परिवाल आदी.


