नंदूरबार (भुसावळ ) – नंदुरबार शहरातील विविध भागांतील रस्त्यांची अतोनात दुर्दशा झाल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे या उदभवलेल्या समस्यांकडे नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले . यानिमित्त महानगर प्रमुख पंडीत माळी यांच्या संकल्पनेतून विविध प्रभागात रस्त्यातील खड्यांत झाडे लावणे सप्ताह साजरा करण्यात आला . या अनोख्या आंदोलनाची सांगता शिवसेना उपनेते, नंदूरबार जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात नगरपरिषद प्रशासन यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध करण्यात आला,


,प्रसंगी मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आपल्या सर्व समस्या व खड्डे बुजविणे कामाला सुरुवात केली, तसेच नविन रस्ता मंजूर असून त्याचे काम देखील लवकरच सुरू करु असे संगितले,यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख दिपक गवते, उपजिल्हाप्रमुख अर्जून मराठे, महानगर प्रमुख पंडीत माळी,शहर प्रमुख राजधर माळी, तालुका प्रमुख रमेश पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाटील, उपजिल्हा प्रमुख गोटू पाटील, नवापूर तालुका प्रमुख, प्रवीण नाईक,अक्कलकुवा श्रीकृष्णकात राणा,महिला आघाडी सोनल चव्हाण, अक्षय श्रीखंडे,राज पाटील,इत्यादी सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.



