भुसावळ सिंधी कॉलनी परिसरात योग्य पद्धतीने कर लागु करा – माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची मागणी –


भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ नगर परिषद इददीतील सिंधी कॉलनी, नानक नगर नवजिवन सोसायटी परिसरातील बांधीव घर बिल्डींग बंगले म्यु. घ. नं पहिला मजला, दुसरा मजला तिसरा मजला यांना शासन निर्णयानुसार लागु करावा अशी मागणी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेने मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे .

निवेदनात म्हटले आहे की प्रशासनाने खुप मेहनतीने खर्च करून शहरातील मुख्य अतिक्रमण काढलेले आहे. परंतु वास्तविकता अशी आहे कि आपल्या भुसावळ नगर परिषदेस जे घरपट्टी टैक्स पावती बांधकाम परवानगी, नुसार वसुली (कर) मिळते ते योग्य प्रकारे मोजमाप करून वसुल करण्यात येते किंवा नाही? या कडे आपल्या प्रशासनाने लक्ष दयावे .
सिंधी कॉलनी नानक नगर नवजिवन सोसायटी ह्या परिसरातील रहिवाशी घरांची पाहणी करून सदर परिसरामधील सर्व लागु असलेले म्यु. घ. नं. यांची बांधकाम परवानगी आहे किंवा नाही याची सखोल चौकशी करण्यात यावी .
रहिवास प्रयोजना करीताचे बांधीव क्षेत्रफळ व नियम नं ७४ असेसमेन्ट उताऱ्यावरील क्षेत्रफळ याची स्वतः शहानीशा करून ते सत्य आहे व सर्वांचे बांधकाम, घरपट्टी टॅक्स पावती व असेसमेन्ट उताऱ्यानुसार सत्य आहे असे लेखी-प्रमाणीत करून पत्र निवेदन कर्त्यास द्यावे व पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला याची योग्य प्रकारे कर आकारणी करून शासनास योग्य वसुली करून द्यावी, तसेच सदर परिसरातील व्यापारांनी उभारलेले दुकाने यांची कर वसुली शासन नियमानुसार करावी .निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे , महासचिव कमलेश शेवाळे व पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .